ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ३० मे रोजी जिल्हा दौऱ्यावर!

अहमदनगर दि.26 मे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
सोमवार दिनांक 30 मे 2022 रोजी सकाळी 6.30 ते 10.30 वाजता पुणे येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व केदारश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब व मा.ना. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री यांचे उपस्थितीत इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपुजन व महाराष्ट्र विधीमंडळातील श्री. बबनराव ढाकणे या ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, बोधेगाव ता. शेवगाव. दुपारी 1 ते दुपारी 2 राखीव. स्थळ- केदारेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ. दुपारी 2 ते 15.45 वाजता स्थळ- केदारेश्वर सहकारी साखर कारखाना येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता कार्यकारी समिती ( जिल्हा नियोजन समिती) ची बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्प क्र. 2 बाबत सर्व संबंधित मंत्री महोदय व आमदार महोदय यांचे समवेत बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. सायंकाळी 5 वाजता कोविड-19 मुळे आई व वडील दोन्ही मयत झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता अहमदनगर येथून चौंडी ता. जामखेडकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते 12 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- चौंडी ता. जामखेङ दुपारी 12 ते 1.30 वाजता चौंडी येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता राखीव. शासकीय विश्रामगृह अहमदनगर. दुपारी 4.30 वाजता अहमदनगर येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.