धार्मिक

30 मे ला कोरठण खंडोबा सोमवती अमावस्या उत्सवात हजारोंच्या गर्दीने दुमदुमणार कोरठणचा गड

पारनेर दि.२३ मे (प्रतिनिधी)
-सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवाला 30 मे रोजी,श्री कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता. पारनेर,जि.अहमदनगर या राज्यस्तरीय “ब” वर्ग तीर्थक्षेत्रावर, भव्य धार्मिक महोत्सव आणि अन्नदान महाप्रसाद हॉल चे उद् घाटन होणार आहे. सहा महिन्यातून येणाऱ्या सोमवती अमावस्या पर्वणीला खंडोबा भक्तांमध्ये मोठे धार्मिक व कुलधर्म कुलाचाराचे महात्म्य आहे.
सोमवार 30 मे रोजी सकाळी ६ वा.श्री खंडोबा मंगलस्नान पूजा,सकाळी ७ वा:-अभिषेक महापूजा आरती होऊन भाविकांना दर्शन खुले होईल. सकाळी १० वा:-देणगीदार आणि देवस्थानने रुपये २४ लक्ष निधीमधून बांधलेल्या अन्नदान महाप्रसाद १ला मजला हॉल चे उद् घाटन,भागवताचार्य ह.भ.प विकासानंदजी मिसाळ महाराज यांचे शुभहस्ते होईल.श्री महाराजांचे प्रवचन,दर्शनसोहळा, देणगीदारांचा सन्मान देवस्थानकडून होईल.
सकाळी ११.३० वा सोमवती अमावस्या पर्वणीनिमित्त देवाच्या उत्सवमूर्ती मंगलस्नानासाठी, पालखी मिरवणुकीने वाजंत्री ताफा,ढोल,लेझीम चे तालावर भाविक भक्त खोबरे भंडारा उधळीत टाक्याचा दाराकडे प्रस्थान होइल. ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात उत्सव मूर्तींना गंगास्नान घातले जाईल. त्यावेळी भाविक भक्तांनी घरातून आणलेल्या देव्हाऱ्यातील टाक स्वरूपातील देवांना ही गंगा स्नान घालून देव भेट घडविता हा सोहळा पारंपारिक व धार्मिक विधीनी कुलधर्म कुलाचार पार पाडीत भक्तमंडळी कृतार्थ होतात. त्यावेळी देवाचे वाघे खंडोबा गाण्यांनी वातावरण भारवून टाकतात.सार्वत्रीक तळी भंडार व महाआरती होऊन पालखी उत्सवमूर्तीसह मंदिरात परतते. दुपारी १२ वा पासून आमटी भाकरी चा महाप्रसाद अन्नदाते ग्रामस्थ जगताप,घुले, खोसे,डावखर,शिंदे,झावरे व ईत्यादी परिवार यांचेकडून सर्वांसाठी नियोजन आहे.
देवस्थानचा पौषपौर्णिमा वार्षिक यात्रा महोत्सव जानेवारी 2022 मध्ये कोरोना मुळे झालेला नाही म्हणून या सोमवती अमावस्या उत्सवाला हजारो भाविकांच्या गर्दीने कोरठणगड दुमदुमणार आहे.
देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, वाहने पार्किंग व दर्शनबारी नियोजन आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी सोमवती अमावस्या पर्वणीला आयोजित धार्मिक कार्यक्रम, अन्नदान-महाप्रसाद हॉल उद् घाटन , प्रवचन,दर्शन सोहळा,पालखी सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे निमंत्रण देवस्थानतर्फे अध्यक्ष ॲड पांडुरंग गायकवाड,उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, चिटणीस मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्वस्त किसन धुमाळ, अमर गुंजाळ, चंद्रभान ठुबे, अश्विनी थोरात, किसन मुंढे, दिलीप घोडके, बन्सी ढोमे, मोहन घनदाट, साहेबा गुंजाळ, देविदास क्षिरसागर यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे