निधन
माहीजळगावचे ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांचे निधन

कर्जत( प्रतिनिधी) : दि १९ मे
माहीजळगाव ता. कर्जत येथील जेष्ठ पत्रकार अशोक संभाजी शिंदे (वय-४७) यांचे बुधवार, दि १८ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर माहीजळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे मागे वडील, पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. शिंदे यांचे वृत्तपत्र आणि पत्रकारीता क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने अशोक शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.