ब्रेकिंग

किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शहरात राबविणार ‘जुन्या विश्वासाचा पोल खोल सप्ताह’ विकासाचे व्हिजन मांडत काळेंचा नागरी समस्यांवरून आक्रमक पवित्रा

अहमदनगर दि. 30 सप्टेंबर (प्रतिनिधी) : नगर शहरात मागील दहा वर्षांमध्ये कोणते ही ठोस असे विकास काम झालेले नाही. या उलट आहे त्यापेक्षा शहर मागे गेले आहे. असे असतानाही काही लोक “विश्वास जुना, आम्हीच पुन्हा” असे म्हणत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण खूप विकास कामे करीत असल्याचे ढोंग करत आहेत. त्यासाठी शहरभर पोस्टरबाजी केली जात आहे. त्यांच्या याच तथाकथित जुन्या विश्वासाची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली काँग्रेस जाहीर पोलखोल करणार आहे. त्याच वेळी शहर विकासाचे व्हिजन देखील मांडणार आहे. यासाठी १ ते ७ ऑक्टोबर असा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने ‘जुन्या विश्वासाचा पोलखोल सप्ताह’ राबविण्यात येणार असल्याची माहिती, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण काळेंचा नागरी समस्यांवरून चांगलाच आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये गुंदेचा यांनी म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यां कडून शहर विकासाचे अनेक दावे केले गेले. सन २०१४ आणि त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत देखील अनेक खोटी स्वप्न दाखविली गेली. जनतेने दिलेल्या संधीतून शहराचा विकास काही झालाच नाही. मात्र स्वतःची पाठ बडवून घेणाऱ्यांचा मात्र खाजगी पातळीवर वैयक्तिक मोठा विकास झाला. सध्या शहरातील नागरिकांना दैनंदिन आयुष्य सुलभ पद्धतीने जगण्या साठीच्या देखील कोणत्याच व्यवस्था देता न येऊ शकल्यामुळे सर्वसामान्य नगरकरांमध्ये सत्ताधाऱ्यां बाबत प्रचंड रोष आहे. त्यामुळे शहरात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

लोकसभेला धूळ चारली, आता विधानसभेलाही… :

नगरकर सोशीक नसून क्रांतिकारी आहेत. लोकसभा निवडणुकीत तथाकथित मातब्बरांना पराभवाची धूळ चारणारा मतदार राजा आता विधानसभेला देखील शहर विकासाचा खोटा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. म्हणून या थापाड्या सत्ताधाऱ्यांच्या तथाकथित जुन्या विश्वासाच्या नौटंकीची पोल खोल किरण काळे करणार असल्याची माहिती मनोज गुंदेचा यांनी दिली आहे. यासाठी सोशल मीडियाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार असल्याचे शहर काँग्रेसने म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे