कोतवाली पोलिसांनी केले २६,४०० रुपये किंमतीचे गोमांस जप्त,एकजण ताब्यात!

अहमदनगर दि.१३ मे (प्रतिनिधी). नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभेदार गल्ली येथे कोतवाली पोलिसांनी कत्तल खाण्यावर छापा टाकत सुमारे २६ हजार चारशे रुपयांचे गोमांस जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे. या बाबतची हकीगत अशी की, दिनांक १३/०५/२०२२ रोजी रात्री ०२.१० वा. सुमारास इसम नामे शहादाब (वय २० वर्षे रा. सुभेदार गल्ली,झेंडीगेट अहमदनगर)हा आपले राहत्या घरात सुभेदार गल्ली येथे महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेल्या गोवंशीय जनावरांचे मांसाचे लोखंडी सत्तुरने तुकडे करुन विक्री करण्याचे उद्देशाने गोवंशीय जनावराचे मांस व लोखंडी सत्तुरसह दिसल्याने त्याचे विरुध्द भादवि कलम २६९ सह महाराष्ट्र पशु संरक्षण ( सुधारणा ) अधिनियम १९९ ५ कलम ५ ( अ ) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे की कोतवाली पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सुभेदार गल्ली झेंडीगेट अहमदनगर येथे एक इसम हा त्याचे घरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची बंदी असतांना देखील गोवंशीय जनावरांची कतल करीत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने १३/०५/२०२२ रोजी रात्री ०१.४५ वा सुमारास पोलीस उपनिरीक्षक महाजन,पोना/योगेश भिंगारदिवे,पोकॉ/अभय कदम,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/दीपक रोहकले,पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/फुंदे,पोकॉ/पालवे,चालक पोना/तांबे हे शासकिय वाहनाने दि.१३/०५/२०२२ रोजी रात्री २ वा. सुमारास डॉ.आंबेडकर चौक,झेंडीगेट अहमदनगर येथे जावून गुप्त बातमीतील ठिकाणी सुभेदार गल्ली झेंडीगेट, अहमदनगर येथे रात्री ०२.१० वाजता पोहचले असता तेथे एक इसम घराला आतून कडी लावुन आत मध्ये काहीतरी तोडत असल्याचा आवाज येत असल्याने त्यास आवाज देऊन घर उघडण्याचे सांगितले असता एक इसम दरवाजा उघडून बाहेर आला व त्याने काय आहे असे विचारले असता त्या इसमास पोलीस आहोत म्हणून आमची व पंचाची ओळख करून देऊन त्यास तुमच्या घराची झडती घ्यावयाची आहे असे सांगून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने नाव शहादाब अकिल कुरेशी वय २० वर्ष रा.सुभेदार गल्ली,झेंडीगेट,अहमदनगर असे सांगुन त्याने या घराची झडती घेण्याची परवानगी दिल्याने पोलीस स्टाफ व पंच असे त्याचे घराचे आत मध्ये जाऊन पाहिले असता सदर घराचे १० बाय १० फूट लांबी रुंदीच्या हॉल मध्ये गोवंशीय जनावरांचे मांसाचे मोठमोठे तुकडे एक लोखंडी सत्तुर सदर ठिकाणी मिळुन आल्याने सदरचे गोवंश जनावराचे मांसाचे तुकडे कशा करीता केले आहेत याबाबत सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यानंतर त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गोवंशीय जनावरांचे मास हे लोखंडी सत्तुरने तोडुन विक्री करण्याकरीता घरामध्ये ठेवले आहे असे सांगितले.पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.