६ मे१९२२ आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज…यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि कोटि प्रणाम विशेष लेख

६ मे १९२२ आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज…यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि कोटि प्रणाम विशेष लेख
” तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधुन काढला या बद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो.
माझी खात्री आहे की डॉ.आंबेडकर तुमचा उध्दार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल कि, ते सर्व हिंदुस्थाचे पुढारी होतील”.
छत्रपती शाहू महाराज🔹
(माणगाव परिषद -१९२० )
राजर्षी शाहू महाराज यांच्या राज्यातील त्यांनी केलेले काही कायदे .
🔷महारांवर कामाची सक्ती न करण्याचा व त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याचा शाहू महाराज यांचा जाहीरनामा.
🔷अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट व त्यांना मानवी स्वातंत्र्याचे हक्क देणारा जाहीरनामा.
🔷गुन्हेगार जातीच्या लोकांची हजेरी पध्दत बंद करावी म्हणून राजाज्ञा.
🔷राज्यातील सरकारी व सर्वसाधारण खात्यात अस्पृश्यांना अग्रक्रम देण्यासाठी आदेश.
🔷प्राथमिक,माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी, म्हणून शिक्षण खात्याला राजाज्ञा.
🔷अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद.सरकारी शाळांमध्ये सर्व जाती- धर्माच्या मुलांना प्रवेश. शाळांतील स्पर्शास्पर्श प्रथा बंदीची राजाज्ञा.
🔷मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रीयांना मोफत शिक्षण व खर्चाची सोय .
🔷स्रीयांचा छळ व घटस्फोट याविषयी स्त्रीयांना संरक्षण देणारा कायदा .
🌷महारांना गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त केल्याची राजाज्ञा
मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांना फी माफ.
🔷विधवा पुनर्विवाह कायदा ‘ व ‘विवाहनोंदणी कायदा ‘ यांची अंमलबजावणी .
” छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!!!
प्रा. विलास साठे सर