कर्जत शहर आणि तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

कर्जत( प्रतिनिधी) : दि ३ मे
कर्जत शहर आणि तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८:३० वाजता शहरातील ईदगाह मैदान कर्जत येथे सामुदायिक ईदची नमाज मुस्लिम बांधवांनी अदा केली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
कर्जत शहर आणि तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मौलाना युसूफ यांच्या मार्गदर्शनाखाली ईद उल फित्रची सामुदायिक नमाज आणि खुदबा मंगळवारी सकाळी ठीक ८:३० वाजता अदा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री तथा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, तालुका प्रशासनातील प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह स्थानिक राजकीय पदाधिकारी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पै प्रवीण घुले, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, गटनेते संतोष मेहेत्रे, उपगटनेते सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, सुनील शेलार, अनिल गदादे आदींनी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यासह मुस्लिम समाज कर्जत यांनी देखील हिंदू बांधवाना अक्षयतृतीय्याच्या शुभेच्छा देत सामजिक सलोख्याचे दर्शन ईदगाह मैदानात दिले. तसेच सर्वांचे आभार व्यक्त करीत सर्वाना शिरखुर्मा पिण्यासाठी आमंत्रण देण्यात आले.
****** तब्बल दोन वर्षांनी ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण
कोरोना पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात कोव्हिड नियमाच्या अधीन राहून ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण करण्यात आली नव्हती. कोरोनानंतर यंदा प्रथमच ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली. यावेळी सर्वत्र रमजान ईदचा उत्साह जाणवत होता.