सामाजिक

स्त्री शिक्षणाची बीजे खोलवर रुजली असून विविध क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे:सुलोचना पटारे

शेवगाव (प्रतिनिधी)

स्त्री शिक्षणाचे बीजे खोलवर रूजले असुन विविध क्षेत्रामध्ये त्यांची कामगीरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणासाठीचे स्वप्न साकार होतांना दिसत आहे. असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी सुलोचना पटारे यांनी नेवासे येथे जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री राजेंद्र जोशी यांच्या सेवापुर्ती सोहळया निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी नवले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळभाउ दौंड, उपसभापती किशोर जोजार, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, शिक्षक बॅकेचे संचालक राजेंद्र मुंगसे, माजी संचालक कल्याणराव शिंदे, पाथर्डी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रविंद्र म्हस्के, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस अनिल बंड, कवी अर्जुन देशमुख, ओ.बी.सी. सेलचे तालुका प्रमुख अशोक गोरे, वृध्देश्वर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक नारायण काकडे, भा.ज.पा. कार्यालयीन प्रमुख दादासाहेब येढे, निजामभाई पटेल आदि उपस्थित होते. यावेळी पटारे पुढे बोलतांना म्हणाले की, पुर्वीच्या काळी स्त्री ची मजल चुल आणि मुल इतकीच होती परंतु सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले त्यामुळेच आज विविध क्षेत्रामध्ये राष्टपती पदापासुन ते संरक्षण क्षेत्रामध्ये सुध्दा महिलांनी आपले योगदान सिध्द केले आहे. कौटुंबिक जबाबदारी पाहुण महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यामुळे आता खऱ्या आर्थाने सावित्री बाईंचे स्वप्न साकार होतांना दिसत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. अशी यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या यावेळी नेवासा पंचायत सिमीतीचे सभापती रावसाहेब कांगुणे बोलतांना म्हणाले की शिक्षणामुळे स्त्री बरोबरच कुटंब साक्षर होण्यास मदत होते. त्यामुळे स्त्री सुशिक्षीत असेल तर कुटुंबावर संस्कार चांगले होतात असे यावेळी बोलतांना ते म्हणाले. पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ भाउ दौंड बोलतांना म्हणाले की स्त्रीयांनी आपल्या पायावर स्वयंभु उभे राहुन आपले वर्चस्व सिध्द करून विविध क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवले असुन त्यांना कुटंबामधुन ही तेवढेच पाठबळ मिळत असल्यामुळे स्रिया आता स्वयंपुर्ण होतांना दिसत आहेत. हा भारतीय संस्कृतीचा ठेवा स्त्रीयांनी आत्मसात करून आपले स्थान निर्माण करावे असे यावेळी बोलतांना ते म्हणाले. यावेळी ग्रामिण साहित्यीक कैलास दौंड यांनी स्त्रीयांची जबाबदारी व त्यांना नोकरी व कुटंब संभाळतांना तारेवरीची कसरत करावी लागते या गोष्टीकडे गांभिर्याने बघुन त्यांच्या आरोग्यासाठी कुटुंबाने सुध्दा त्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना केली. या कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील शिक्षक वृंद व सतिष जोशी, रविंद्र जोशी, अॅड नंदकुमार जोशी, पत्रकार रमेश जोशी, किरण चंद्रात्रे, श्रीकांत जोशी, शेखर देशमुख, किशोर देशमुख,राजेंद्र जोशी, योगेश जोशी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुषार जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी केले व आभार राजेंद्र जोशी यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे