सामाजिक
निलक्रांती चौक येथे 40 वर्षापासून “भीम उत्सवाचा ” जल्लोष! “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी ” या भीमगीतावर वातावरण झाले भीममय! महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन! अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सर्वत्र मोठया आनंदात साजरा होत असतो. जयंती सप्ताहानिमित्त निलक्रांती चौक येथे निलक्रांती मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमाताई जावळे यांच्या भीम बुद्ध गीतांचा गायन कार्यक्रम मोठया जल्लोषपूर्ण वातावरणात घेण्यात आला. क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत अभिवादन करून महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी”, “भीमराज कि बेटी मै तो जयभीमवाली हूं ” यासारख्या गाण्यामुळे सर्व वातावरण भीममय झाले होते. यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भीमराव पगारे,देशस्तंभ न्यूजचे पत्रकार महेश भोसले, निलक्रांती बग्गीचे संचालक सुनील साळवे, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश साळवे, किशोर साळवे,विनाताई कांबळे, अनुराधाताई साळवे, भगवानराव साळवे, शरद जाधव, विलास साठे सर, सुमेध गायकवाड, बाळासाहेब विधाते, नितीन कसबेकर, सतीशकुमार चाबुकस्वार सर, सुशांत म्हस्के, बोद्धाचार्य संजय कांबळे, रवींद्र वाघचौरे, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड,कक्ष्यप साळवे, सुमेध साळवे,विनोद भिंगारदिवे, सुरेश शिरसाठ, आकाश साळवे,रोहित (बंडू ) आव्हाड, राजेंद्र शिरसाठ, वृषाल साळवे, निखिल साळवे, श्रीकांत भोसले, प्रशांत भोसले, रवींद्र शिंदे, अविनाश शिंदे, विक्रम शिंदे, विनायक संभागळे,मनोज साळवे,गणेश साळवे, विनोद साळवे, सुशांत शिरसाठ, मयूर पाचारणे, गोपी साळवे, अक्षय वाघचौरे,सुशांत भोसले, संदेश भोसले,सुजित साळवे,किरण साळवे, महेर मिसाळ, अक्षय साळवे, मिलिंद साळवे, संदीप साळवे, तेजस पाचारणे, किरण पवार आदी कार्यकर्ते गौतमनगर व शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
