आ.लंके यांचा सामाजिक वारसा हंगेकरांनी केला जतन ! लंके प्रतिष्ठान हंगे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्य वाटप !

पारनेर दि.२६ जुलै (प्रतिनिधी) :
आपल्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्रभर एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे पूर्णवेळ सर्वसामान्य जनतेत रममान होऊन त्यांच्या विविध समस्या सोडवण्याचे काम करत असतात .आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक जाणीव ठेवून निलेश लंके प्रतिष्ठान हंगा येथील प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना आपलाही काहीतरी हातभार लागावा या परोपकारी जाणीवेतुन पारनेर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हंगे विद्यालयात हंगे गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल हंगे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना निलेश लंके प्रतिष्ठान,हंगे यांच्या वतीने आ.लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तालुक्याचे आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थितीत व श्री पोपट इथापे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाळवणे गावचे उपसरपंच श्री.सचिन पठारे,आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री सौ . शकुंतला लंके व वडील श्री.ज्ञानदेव लंके गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत
हंगे गावचे सरपंच श्री . जगदीप साठे,उपसरपंच सौ.माया गणेश साळवे, श्री.बाळासाहेब दळवी,श्री राजेंद्र शिंदे,श्री बाळासाहेब शिंदे,श्री राजेंद्र दळवी,श्री सोपान दळवी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री.बाबासाहेब दळवी,व्हाईस चेअरमन श्री.भाऊसाहेब रासकर व सोसायटीचे सर्व सदस्य, तसेच श्री.दिपकशेठ लंके,माजी सरपंच श्री संदिप शिंदे,निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सचिन साठे व सर्व सदस्य,आदर्श शिक्षक श्री.प.स.सोंडकर गुरुजी,श्री मनोहर दळवी सर,उद्योजक श्री.दिपक बोर्डे,श्री.दिलीप दळवी,श्री.रणजीत दळवी,श्री.प्रशांत साठे,श्री अजय साठे,श्री काशिनाथ साठे,श्री जयसिंग गवळी,श्री बाबा नवले,श्री गणेश साळवे,श्री नंदू सोंडकर,श्री सुभाष ठोंबरे,हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुनिल ठुबे सर,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक खामकर सर व परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी आमदार लंके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आमदार श्री निलेशजी लंके साहेब यांचा फोटो असलेला व पाठीमागच्या बाजूला विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देणारा संदेश असणारा पॅड , पेन व इतर साहीत्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
शाळा भेटीच्या वेळी आमदार श्री निलेशजी लंके साहेब नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत असतात,त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच त्यांनी दिलेले हे साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार निलेश लंके साहेब व त्यांच्या मातोश्री सौ. शकुंतला ज्ञानदेव लंके यांचा व विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
न्यू इंग्लिश स्कूल हंगे विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री अक्षय मारुती साठे यांची पी.एस.आय.पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील विद्यार्थ्यांना विनामोबदला शारीरिक शिक्षणाचे धडे गिरवणारे श्री अशोक साठे मेजर यांचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदिप शिंदे सर यांनी केले तर आभार श्री अनिल खांदवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.शोभा भालेराव मॅडम यांचे व सर्व सेवकांचे सहकार्य लाभले.