सामाजिक
बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून नेहमीच लोकहिताचे कामे

अहमदनगर दि. २३ जून (प्रतिनिधी)
स्थलांतरित कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून प्रकल्प समन्वयक भावना घाटविसावे यांनी केले आहे.
महर्षी ग.ज. चितांबर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पहिली ती अकरावी पर्यंतच्या पंचवीस विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत प्रवेश मिळून दिला आहे.
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रांतर्गत या शाळाबाह्य मुलांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.