प्रशासकिय

दुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर,दि.१३ (प्रतिनिधी) :- दुचाकी संवर्गातील नवीन वाहनासाठी १९ एप्रिल २०२२ रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी १२ ते २८ एप्रिल २०२२ (मंगळवार ते सोमवार) या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक ०५ येथे डिमांड ड्राफ्ट जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तींच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, (फोटो आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल सह) जोडावा. पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प बँच/ ट्रेझरी ब्रँच, कोड नं. 13296 करीता देय असावा.
एकाच पसंतीक्रमासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी १८ एप्रिल २०२२ रोजी ५ वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्यात येईल. उपरोक्त यादी असलेल्या पसंतीक्रमांकासाठी ज्यानी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी १९ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफा सिलबंद करून खिडकी क्र.०५ येथे जमा करावा. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन बंद सिलबंद लिफाफयात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धाकांनी १९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधीत अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे