राजकिय
राहूरी तालुक्यातील पारधी कुटुंबांना पन्हाळी पत्र्यांचे वाटप
आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते वाटप

अहमदनगर,दि.५ एप्रिल (प्रतिनिधी)- आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते ४ एप्रिल रोजी राहूरी तालुक्यातील पारधी समाजातील ६३ कुटुंबांना पन्हाळी पत्र्यांचे वाटप करण्यात आले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (राजूर) यांच्यावतीने राहूरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पारधी विकास योजना २०२१-२२ मधून प्रत्येक कुटुंबाला दहा फुटी आठ पत्रे असे एकूण ५०४ पत्र्यांचे यावेळी वाटप करण्यात आले .
पारधी समाजाला इतरही योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पारधी समाजाने मुलांना शिक्षण द्यावे. शासनाच्या विविध योजना व कुटुंबियांचा स्तर उंचवावा. अशी अपेक्षा यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. राहुल गवळी, भारत भुजाडी आदी याप्रसंगी उपस्थित होते.