राजकिय

निंबोडी-नवसरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोनबा जगताप तर उपाध्यक्षपदी गीतेश जगदाळे यांची निवड

कर्जत प्रतिनिधी : दि ५ एप्रिल
कर्जत तालुक्यातील निंबोडी-नवसरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोनबा जगताप यांची तर उपाध्यक्षपदी गीतेश जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी टी पी टेकाळे यांनी सदर निवडी जाहीर केल्या.
कर्जत तालुक्यातील निंबोडी-नवसरवाडी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीवर महाविकास आघाडीच्या शिव शंभो विकास पॅनलने १३ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्ता स्थापन केली होती. रविवार, दि ३ एप्रिल रोजी सदर सोसायटीच्या पदाधिकारी निवडी निवडणूक निर्णय अधिकारी टी पी टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये सोनबा जगताप यांची अध्यक्षपदी (चेअरमन) तर गीतेश जगदाळे यांची उपाध्यक्षपदी (व्हाईस चेअरमन) बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सर्व नुतन पदादधिकारी आणि सदस्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नुतन अध्यक्ष सोनबा जगताप यांनी सर्वाना सोबत घेत सोसायटीत काम करण्याचे आश्वासन दिले. यासह सर्व मतदाराचे आभार मानत दिलेला शब्द आणि विश्वास नुतन पदाधिकारी पाळतील याची ग्वाही दिली. यावेळी जगनाथ श्रीपती चव्हाण, बबन साहेबराव मेंगडे, गहिनीनाथ आजिनाथ नवसरे, जगदीश भागवत नवसरे, कांतीलाल हनुमंत गरड, नितीन संभाजी गरड, प्रकाश भागवत रंधवे, ज्ञानदेव शेटिबा तांदळे, सदस्या लता युवराज मच्छीन्द्र, जयश्री ज्ञानदेव लाड आणि आशाबाई जालिंदर पवार यांच्यासह सरपंच हनुमंत नवसरे, सुरेश नवसरे, चेअरमन उत्तम गरड, बाळू जेवे, सरपंच अंगद गरड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे