कौतुकास्पद

ग्रो फाउंडेशनतर्फे राबविला जातोय क्‍लॉथ़्‌ डोनेशन हा उपक्रम!

अहमदनगर दि.9 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
देणे ही कृती आहे पण मन लावून देणे हे कला आहे.
ग्रो फाउंडेशन तर्फे क्‍लॉथ़्‌ डोनेशन हा उपक्रम राबवला जात आहे. ते म्हणतात चांगलं करण्यासाठी काहीतरी मोठं केलं पाहिजे तसं नाहीये तुम्ही रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधुन लोकांना मदत करू शकतात या कडाक्याच्या थंडीमध्ये काही लोकांनाच्या जीवाला धोका निर्माण होतो ज्यांची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही म्हणजे स्वतःसाठी अन्नाचीही सोय करू शकत नाही. अशा लोकांनी कपड्याची सोय कशी करणार त्यांच्यासाठी हा काळ विशेषतः आव्हानात्मक आहे. त्यांच्यासाठी थंडी अनेक अडचणी आणतात त्यात कपडे हे एक आहे लोकांना कपडे दान करून गरजूंना पैसे खर्च न करता कपडे घालायला मिळतील. त्यामुळे त्यांनी या थंडीत काहीसा दिलासा मिळेल थंडी वाढली की लोकांना पुरेशी प्रमाणात ऊबाबदार कपड्याची गरज असते.पण फारसे कमी लोक असतात त्यांनाही कपडे देखील उपलब्ध नाहीत क्‍लॉथ़्‌ डोनेशनच्या माध्यमातून गरजूंना घालण्यासाठी कपडे मिळते ज्या लोकांकडून कपड्यामधील वापरत नसेल कपडे गरजूंना द्या त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्ही फक्त आम्हाला सांगायचे की आमच्याकडे कपडे आहेत आम्ही ते स्वतः घ्यायला देऊ त्यांच्या गरजेनुसार आम्ही त्यांना कपडे देऊ आमचा नंबर 8149687779 आहे निस्वार्थ भावनेने केलेली माणसाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. आणि मग ही चांगले ठेवते आपल्या छोट्याशा कृतीमुळे जर कोणाची मदत होत असेल तर आपण आपल्याला हे पाऊल टाकायला हवे आणि सगळ्यांची दिवाळी अजून चांगल्या पद्धतीने साजरी होईल. आणि या कपड्यामुळे गरिबांना थंडीपासून वाचवण्यास मदत होईल आणि तसेच कपड्यातून नाही. तर प्रत्येक क्षेत्रात गरिबांना आपण मदत केलीच पाहिजे. आणि आपणही पुढाकार घेतलाच पाहिजे.
ग्रो फाउंडेशनतर्फे या दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे