कौतुकास्पद

राहुरी शहरात बाजार पेठेतील 4 दुकाने फोडुन घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी 4 दिवसांत अटक! सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका

राहुरी दि. 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
दि. 19/02/2024 रोजी रात्री 8 ते दि.20/02/2024 रोजी सकाळी 08.00 वा. दरम्यान राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण 46000 /- रुपयाचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केलेली होती. त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 181/2024 भा.दं.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयामध्ये आरोपी बाबत काही एक माहिती नसतांना गुन्हयाचा तांत्रीक पुराव्याच्या आधारे व राहुरी शहरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज वरुन केलेल्या तपासामध्ये एक संशयीत आरोपीची माहिती उपलब्ध झाली. सदरची माहिती सोशल मिडीयाच्या आधारे प्रसार केल्याने आरोपी दगडुबा मुकुंदा बोर्डे रा.पेरजापुर ता.भोकरदन जिल्हा जालना हा इगतपुरी पोलीस स्टेशन जि.नाशिक येथे मिळुन आला. आरोपीस ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे आणुन आरोपीस नमुद गुन्हयामध्ये 24/02/2024 रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपीस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. कोर्ट राहुरी यांच्या समक्ष हजर करण्यात आले असुन आरोपची दि.29/02/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पो.हे.कॉ. 663 बाबासाहेब शेळके नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहेत.
अ.क्र. पोलीस ठाणे गु.र.नं कलम
1 रायपुर पोलीस ठाणे 34/2017 भा.द.वि.क 457,380
2 सिल्लोड सिटी पोलीस ठाणे 71/2018 भा.द.वि.क 380,411
3 सिल्लोड सिटी पोलीस ठाणे 117/2013 भा.द.वि.क 454,380
4 सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे 133/2015 भा.द.वि.क 379
5 बुलढाणा पोलीस ठाणे 655/2018 भा.द.वि.क 457,380,511
6 अजिंठा पोलीस ठाणे 201/2017 भा.द.वि.क 380,461
7 अजिंठा पोलीस ठाणे 237/2017 भा.द.वि.क 380,461
8 भोकरदन पोलीस ठाणे 77/2015 भा.द.वि.क 379,34
9 भोकरदन पोलीस ठाणे 154/2015 भा.द.वि.क 380,457,511
10 भोकरदन पोलीस ठाणे 30/2013 भा.द.वि.क 457,380
11 भोकरदन पोलीस ठाणे 34/2014 भा.द.वि.क 457,380
12 भोकरदन पोलीस ठाणे 107/2015 भा.द.वि.क 457,380
13 हसनाबाद पोलीस ठाणे 40/2014 भा.द.वि.क 379
.विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परीक्षेत्र नाशिक यांनी एक सी.सी.टी.व्ही. कॅमेरा दुकानासाठी व एक सी.सी.टी.व्ही.कॅमेरा शहरासाठी अशी संकल्पना राबविलेले आहे. या संकल्पना आधारेच सी.सी.टी.व्ही. कॅमेराच्या आधारे आरोपीचा शोध होवुन गुन्हा उघडकीस आलेला आहे. तरी राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येते की, राहुरी तालुक्यातील सर्व नागरीक, व्यापारी , दुकानदार यांनीही मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेस प्रतिसाद देवुन सी.सी.टी.व्ही.कॅमेरा बसवावेत.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पोहेकॉ. विकास वैराळ, पोहेकॉ बाबासाहेब शेळके, पो.हे.कॉ.विकास साळवे, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पोकॉ अमोल गायकवाड, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर व पो.ना.सचिन धनद, पो.ना.संतोष दरेकर, पो.ना.रामेश्वर वेताळ नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेलाआहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे