सामाजिक
चांदे खुर्द येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत शाळेत पोषण आहार प्रदर्शन

चांदे खुर्द (वार्ताहर)कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत शाळेत पोषण आहार प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होत्या. प्रदर्शनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आकाश गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले . विद्यार्थी व माता यांना पोषण आहार प्रतिज्ञा श्री दीपक कारंजकर यांनी दिली. तसेच मुलांना पोषण आहार देण्याविषयी मार्गदर्शन केले स्वच्छता महत्व, आरोग्याच्या चांगल्या सवयी, पौष्टिक पदार्थ यांची माहिती दिली. शेवटी मुख्याध्यापक नितीन डमरे सरांनी सर्वांचे आभार मानून उपक्रमात अशाच प्रकारे उस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.