आरोग्य व शिक्षण

श्री आनंद महाविद्यालयात ई कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न

पाथर्डी (प्रतिनिधी)
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे नॉलेज ब्रिज व डिजिटल टिचींग सोलुशन यांच्या संयुक्त विद्यमाने ई कंटेंट डेव्हलमेंट या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्य शाळे चे उद्घाटन संस्थेचे सचिव माननीय सतीशजी गुगळे यांचे हस्ते करण्यात आले. प्रा. एकनाथ कोरे व प्रा.भुषण कुलकर्णी यांनी उपस्थित शिक्षकांना शैक्षणिक व्हिडिओ मेकिंग चे प्रशिक्षण दिले.
या कार्यशाळमध्ये संस्थेचे सचिव मा. सतीश लालजी गुगळे यांनी मार्गदर्शन करताना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई कंटेंट तयार करावे व त्याचा उपयोग विद्यार्थांना व्हावा अशी आशा व्यक्त केली . या व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थांना तो मुद्दा पुन्हा शिकता येईल . असे त्यांनी सांगितले . या प्रसंगी संस्थेचे खजिनदार मा. सुरेशभाऊ कुचेरीया, विश्वस्त मा. धरमशेठ गुगळे, मा. राजूशेठ मुथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार व इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे