संगमनेर कन्या ह.भ.प. रोहिणी ताई राऊत महिला भूषण पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी) सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची सभा अहमदनगर येथे नुकतीच पार पडली त्यावेळी आमदार निलेश लंके, पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे व इतर मान्यवरांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंच उपस्थित होते.
याप्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त महिलाभूषण पुरस्कार – २०२२ प्रदान करण्यात आले. वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध किर्तनकार अनेक सन्मानाने गौरविण्यात आलेल्या वारकरी क्रांती सेना महिला प्रदेशाध्यक्ष व भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा संगमनेरच्या लाडक्या कन्या महाराष्ट्रभूषण ह.भ.प. रोहिणीताई महाराज राऊत यांचा आमदार निलेश लंके व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिलाभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याचबरोबर वारकरी क्रांती सेनेचे सोशल मीडिया प्रमुख आदित्य भागवत व त्यांच्या पत्नी वैद्यकीय क्षेत्रात प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे कार्यरत असणाऱ्या सौ. कविता आदित्य भागवत या पती – पत्नीचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
त्याचबरोबर सरपंच सेवा संघाचे व महाराष्ट्रातील आलेल्या मान्यवरांचे ह.भ.प. रोहिणीताई राऊत यांनी आभार व्यक्त केले.
तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.