गुन्हेगारीब्रेकिंग

“त्या” बोगस आर्किटेक्टवर अखेर दिल्लीत गुन्हा दाखल!

अहमदनगर दि.२५ (प्रतिनिधी)
अहमदनगर येथील ओम मुकुंदराव नगरकर ऊर्फ ओम गवळी यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून कौसिंल ऑफ आर्किटेक्चरचे रजिस्ट्रेशन मिळविल्यामुळेे त्यांच्यावर लोदी रोड नवीदिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ओम नगरकरांनी आर्किटेक्चर पदवीला प्रवेश न घेता परिक्षा पास झाल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून 2020 मध्ये कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर या शिखर संस्थेचे रजिस्टेशन प्राप्त केले. यानुसार त्यांना कौन्सिलचा रजिस्ट्रेशन क्रमांक देखिल देण्यात आला. परंतु
द इन्डियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्चरच्या अहमदनगर सेेंटरने यावर आक्षेप घेतला. सदर व्यक्तीने सादर केलेले सर्व कागदपत्रे बनावर असल्याचे पुरावे त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरला सादर केले.
त्यानुसार कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ओम नगरकर यांचे रजिस्ट्रेशन तातडीने गोठविले आणि त्यांना मुळ प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. कौन्सिलने अनेक पत्र लिहून खुलासा मागविला तरी सदर व्यक्तीने मुळ प्रमाणपत्र सादर केले नाही. शेवटी कौन्सिलने 7 जुलै 2021 रोजी अंतिम नोटीस देऊन मुळ प्रमाणपत्रे विहीत मुदतीत सादर केली नाही तर बनावट कागदपत्रे दाखल करून कौन्सिलची फसवणूक केल्यामुळे सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सूचित केले. तरी देखील ओम नगरकरांनी मुळ कागदपत्रे दाखल न केल्यामुळे शेवटी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ओम नगरकराविरूद्ध बनावट कागदपत्रे सादर करून कौन्सिलची फसवणूक केल्याचा गुन्हा लोदी रोड पोलीस स्टेशन, नवी दिल्ली येथे दाखल केला.
बोगस आर्किटेक्ट पासून लोकांची फसवूनुक रोखण्यासाठी द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टच्या अहमदनगर सेंटरने सातत्याने पाठपुरावा केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे