मिरजगाव बाजार समितीत कांद्यास प्रती किलो १४ रुपये बाजारभाव बाजार भाव स्थिर शेतकरी चिंतेत

कोंभली सर्कल (प्रमुख वार्ताहर) दिवसेंदिवस कांदा हा शेतकऱ्याचे मुख्य पीक होत चाललेले आहे व मानवी जीवनात आहारामध्ये महत्त्व वाढत चाललेले असल्याने शेतकरी कांदा पिकावर भर देत आहे परंतु योग्य बाजार भाव मिळणे हे अपेक्षित आहे परंतु आवक जावक जास्त व कमी प्रमाणात होत असल्याने कांदा बाजार भाव स्थिर राहत नाहीत. चढ-उतार होत आहेत दिनांक 06/09/2022 रोजी मिरजगाव आडत मार्केट मध्ये प्रति किलो 14 रुपये बाजार भाव मिळत आहे परंतु शेतकरी यांना आपला कांदा आहे त्या बाजार भावामध्ये विकत आहेत व बाजार भाव वाढत नसल्याने दैनंदिन गरजा भागवण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असल्याकारणाने आहे त्याच परिस्थितीमध्ये कांदा देणे हाच एक पर्याय शेतकरी वर्गाकडे आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे
👉शेतकरी प्रतिक्रिया: निर्यात करण्यात सरकार समर्थ नाही का, निर्यात का होत नाही असे प्रश्न शेतकरी वर्गात आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे व निर्यत कधी चालू होते याच्याकडे शेतकऱ्यांनाचे लक्ष लागलेलं आहे.