देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 10 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्यामुळे आंबेडकरी समाजाच्या वतीने मार्केयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून निदर्शन करण्यात आली यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अजय साळवे , सुमेध गायकवाड ,ज्येष्ठ नेते संभाजीराव भिंगारदिवे, किरण दाभाडे , विजय गव्हाळे, प्रा. डी.आर. जाधव, ऍड संदीप पाखरे, विलास साठे, गौतमीताई भिंगारदिवे, संजय जगताप, संजय साळवे, सिद्धार्थ आढाव, कदम सर, अंकुश मोहिते, वैभव कांबळे, कौशल गायकवाड, निखिल साळवे, पोपट जाधव, अशोक खंडागळे, विशाल भिंगारदिवे, सतीश साळवे, बंटी शिरसाठ, सुजन भिंगारदिवे, गणेश गायकवाड आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुरेश बनसोडे म्हणाले की, अभिनेता सोलापूरकर यांनी कुठल्याही प्रकारचे महापुरुषांच्या संदर्भात अभ्यास केलेला नाही त्यामुळे या व्यक्तीचा जाहीर निषेध करून यापुढे जर महापुरुषांबद्दल अपशब्द व्यक्त केले तर तुडवल्याशिवाय आंबेडकरी जनता शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा