देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 24 सप्टेंबर : जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षल काकडे यांनी त्यांच्या मातोश्री बुद्धवासी गिरिजा महादेव काकडे यांच्या स्मरणा निमित्त अहिल्यानगर येथील वडगाव गुप्ता रस्ता येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूक बधिर विद्यालय व वस्तीगृह येथे अन्नदानाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी मधुकर भावले, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे, विकास रणदिवे, विवेक विधाते, त्याचप्रमाणे विदयालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भावले यांनी उपस्थित मान्यवरांना संस्थेच्या कामकाजा विषयी माहिती सांगितली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा