माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपचारार्थ रुग्णालयात भरती

नागपूर दि.१३ मार्च (प्रतिनिधी) लॉंगमार्च प्रणेता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार.प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची 8 मार्च रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे रामदास पेठेतील डाॅ.कानफाडे यांच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
युरीनची समस्या उद्भवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता 8 मार्च पासून त्यांचेवर योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती कळताच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी आदरणीय प्रा.जोगेंद्र कवाडे सरांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असता त्यांची तब्येत सध्या स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे कवाडे सर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी त्यांना पुढील 8 दिवस सक्त असा विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे येत्या 18 मार्च पर्यंतचे राज्यातील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.