महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकात तांदळे यांची नियुक्ती

कर्जत (प्रतिनिधी) : दि १३ मार्च
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस म्हणून कर्जतचे चंद्रकांत तांदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवार, दि १२ मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात सदर निवडी नियुक्ती संपन्न झाली.
शनिवारी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नारायण घुले पाटील, सचिन खराद, किरण जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर कृषी सहाय्यकांची बैठक पार पडली. यामध्ये कृषी सहाय्यक जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ बाचकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर जिल्हा सरचिटणीसपदी कर्जत कृषी विभागाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत तांदळे यांची निवड करण्यात आली. तांदळे यांनी आपल्या कृषी सहायक तालुकाध्यक्ष असताना संघटनेसाठी भरीव कार्य केले होते. यासह कोरोना काळात आपल्या सहकार्याना मोठा दिलासा दिला होता. तांदळे यांच्यासह कर्जतच्या सुवर्णा भोस यांना राज्य महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून सचिन खेतमाळस तसेच जामखेडचे कृषी सहायक जयवंत गदादे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यासर्व पदाधिकाऱ्यांच्या दोन्ही तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
कर्जत तालुकाध्यक्षपदी अनिल तोरकड तर सचिव रामदास भारती
कर्जत तालुका कृषी सहायक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी अनिल तोरकड तर सचिव रामदास भारती यांची निवड करण्यात आली. यासह आदी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.