राहुरी येथे अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यावर एलसीबीचा छापा!

अहमदनगर दि.५ डिसेंबर (प्रतिनिधी) राहुरी येथे अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यावर एलसीबी चा छापा टाकला असून दोन आरोपीविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/मनोहर शेजवळ, विष्णु घोडेचोर, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, मपोना/भाग्यश्री भिटे, पोकॉ/रोहित येमुल, सागर ससाणे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.03/12/2022 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 02 ठिकाणी छापे टाकुन एकुण 50,600/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 30 सिलबंद बाटल्या, गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 800 लि. कच्चे रसायन, 70 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 02 आरोपीं विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1. राहुरी 1246/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) 1) राजू भगवान शिंदे रा. डिग्रस, ता. राहुरी 7,000/- रु.किची 70 लि. तयार दारु
2,100/- देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 30 सिलबंद बाटल्या
2. राहुरी 1247/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) एक महिला आरोपी 30,000/- रु.किचे 600 लि. कच्चे रसायन
5,000/- रु.किची 100 लि. तयार दारु
एकुण 1 पुरुष
1 महिला 50,600/- रु. कि.ची 800 कच्चे रसायन 70 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु व देशी बॉबी संत्रा कं.च्या 30 सिलबंद बाटल्या
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/मनोहर शेजवळ, विष्णु घोडेचोर, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, मपोना/भाग्यश्री भिटे, पोकॉ/रोहित येमुल, सागर ससाणे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.03/12/2022 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 02 ठिकाणी छापे टाकुन एकुण 50,600/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 30 सिलबंद बाटल्या, गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 800 लि. कच्चे रसायन, 70 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 02 आरोपीं विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत