
अहमदनगर दि.१० मार्च ( प्रतिनिधी) जागतिक महिलादिन नुकताच सर्वत्र साजरा करण्यात आला.विविध ठिकाणी महिलांचे सत्कार व सन्मान करत हा दिवस साजरा केला गेला.सत्कार ,सन्मान व इतर अनावश्यक खर्च टाळत शहरातील महिलांनी आपण समाजातील गोरगरीब,पीडित,मनोरुग्ण, वृद्ध यांचे काहीतरी देणे लागतो या सामजिक भावनेने तळागाळातील घटकांसाठी कार्य करणाऱ्या नगर तालुक्यातील देहरे येथील माऊलीसेवा प्रतिष्ठानला मदतीचा हात देत अनोख्या पद्धतीने जागतिक महिलादिन साजरा केला.यावेळी प्रतिष्ठान च्या संस्थापिक श्री. व सौ.डॉ.धामणे मॅडम यांनी या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.या सामजिक उपक्रमासाठी सौ.सुप्रिया बावकर, सौ.माधवी दांगट,सौ.भावना केदार,सौ.मनीषा सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले.या उपक्रमाची नगर शहरातून चर्चा व कौतुक होत आहे.