धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईत विजय वंचितांचा होईल. -डॉ.सुरेश शेळके

अहमदनगर दि.८ मार्च (प्रतिनिधी)
आधुनिक भारताच्या लोकशाहीचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या उत्कर्षाचे स्वप्न पाहिले होते. प्रस्थापित पक्षांनी दुर्बल समुहांकडे सतत दुर्लक्ष केले आहे. लोकशाहीचे सामाजिकरण झाले पाहिजे या भूमिकेतून समस्त वंचितांना प्रतिनिधित्व बहाल करुन स्वाभिमानी सत्ता प्राप्त करण्यासाठी बहुजन नायक ऍड.बाळासाहेब आंबेडकर कार्यप्रवण आहेत. प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या कुशल मार्गदर्शनाने महाराष्ट्रात वंचित आघाडीचा झंझावात सुरु असून सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय वंचितांना वाटा मिळणार नाही. जिल्ह्यातील वंचित घटकांनी आपल्या न्याय हक्कासाठी वंचित आघाडी सोबत राहण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्ता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रभारी डॉ. सुरेश शेळके यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीची दुसरी जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृहावर अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉ. सुरेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व ज्येष्ठ मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या प्रक्षेत्रातील जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण,नगर पालिका व नगर पंचायतीच्या संघटन बांधणीचा अहवाल सादर केला. अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी वंचितांच्या सत्ता प्राप्ती साठी जिल्हा व तालुका कार्यकारिणी सक्षम असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचितांचा करिश्मा दिसणार आहे असा विश्वास व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा वाढता प्रभाव बघून प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळं ते चळवळीतील विखुरलेल्या गटातटाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून वंचितांचे कार्यकर्ते पळविण्याचे काम करत आहेत परंतु ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान कार्यकर्ते अश्या आमिषांना कधीही बळी पडणार नाहीत अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी युवा कार्यकर्ते राकेश भोगवाल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. तसेच जिल्हा प्रभारी डॉ. सुरेश शेळके व जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी नवनियुक्त भिंगार शहर, कर्जत, शेवगाव, पाथर्डी तालुका कार्यकारणीचा सत्कार केला.
या महत्वपूर्ण अहमदनगर दक्षिण आढावा बैठकीस वंचित बहुजन आघाडी जिल्हा सल्लागार जिवन पारधे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, सुरेश कोंढलकर, सचिव चंद्रकांत नेटके, शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, प्रवीण ओरे, भाऊ साळवे, अमर निरभवणे, अजीम शेख, प्यारेलाल शेख, पोपटराव शेटे, मारुती पाटोळे,रवी जाधव, अतिश पारवे, युवाआघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्तुती सरोदे, युवा आघाडी महासचिव विशाल साबळे, सागर ढगे, किरण पाटोळे, मयूर भिवसने तसेच महिला आघाडी, युवक आघाडी, विद्यार्थी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे, सूत्रसंचालन जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केले तर आभार महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक जयश्री शेंडगे यांनी मानले.