घोषणा झालेल्या तीनशे कोटी रुपयांच्या निधीतून नगरकरांची घरपट्टी माफ करावी बहुजन समाज पार्टीची महापालिका आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर १७ नोव्हेंबर (प्रतिनिधी)- कोरोना काळात घोषणा झालेल्या शहर विकासाच्या तीनशे कोटी रुपयांच्या रकमेतून तात्काळ सर्व नगरकरांची घरपट्टी माफ करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सचिव राजू गुजर, शांताराम बनसोडे, मारुती विधाते, अमृत वनम, मयूर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
अहमदनगर शहर विकासासाठी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा रावसाहेब दानवे यांनी केली होती. दोन वर्षातील कोरोनाच्या नैसर्गिक आपत्ती काळातील घरपट्टी नागरिकांना माफ झालेली नाही. शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे घोषणा केलेला निधी मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत तात्काळ मंजूर करुन द्यावा. तर या निधीतून शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
————————
नैसर्गिक आपत्तीकाळातील मघरपट्टी माफी मिळावी. शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा मिळावा. यासाठी बहुजन समाज पार्टीसह इतर सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. केंद्रामधे भाजपाची सत्ता आहे त्याचप्रमाणे राज्यातही भाजपा शिंदे गटाच्या सेनेची सत्ता आहे. रावसाहेब दानवे यांनी शहरासाठी 300 कोटी रूपये देतो म्हणून शब्द दिला होता. महापालिका प्रशासनाने राज्यसरकार व शहरात येणारे पुढारी यांना प्रस्ताव देऊन केलेल्या घोषणांची आठवण करुन द्यावी व सर्वसामान्य नागरिकांची या निधीतून घरपट्टी माफ करावी. -संतोष जाधव (शहराध्यक्ष, बसपा)