अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घडवलीअद्दल
आरोपींना काही तासातच केली अटक

कर्जत (प्रतिनिधी) दि ७ मार्च
माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी निर्भया (बदललेले नाव) दि.२ रोजी शिक्षणासाठी महाविद्यालयात आली असता तिला ईश्वर जयराम हुलगुंडे (रा.खंडाळा ता. कर्जत) याने हातवारे करून खुणावले.मात्र याकडे दुर्लक्ष करत निर्भया आपल्या घरी निघून गेली.त्यानंतर दि.४ रोजी निर्भया पुन्हा महाविद्यालयासाठी आली असता कर्जत बसस्थानक येथे तोच संबंधीत मुलगा आपल्या एका मित्रासह निर्भयाजवळ आला आणि ‘तू मला आवडतेस व मी तुला लाईक करतो’ असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत हातवारे करून बोलू लागला. त्याचवेळी त्याच्या सोबत असलेला त्याचा जोडीदार निर्भयाला ‘तु तुझा मोबाईल नंबर माझ्या मित्राला दे’ यावेळी निर्भया यावर काहीच न बोलता पुढे चालू लागली. दोघांनीही तिचा पाठलाग केला.भीतीपोटी तिने एका अनोळखी इसमाच्या फोनवरून आपल्या भावाला फोन करून हकीकत सांगून बसस्थानकात बोलावले. निर्भयाचा भाऊ तात्काळ त्या ठिकाणी आल्यानंतर निर्भयाने तिला त्रास देणारा मुलगा दाखवला. त्रास देणारी दोन्हीही मुले ईश्वर जयराम हुलगुंडे (रा. खंडाळा ता.कर्जत) व विजय हुलगुंडे (रा.गोयकरवाडी ता.कर्जत) अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले. निर्भयाच्या भावाने ‘तुम्ही माझ्या बहिणीची छेड का काढली? अशी विचारपूस करत असता दोघांनीही तेथून पळ काढला. ही माहिती कर्जत पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यानंतर निर्भया व तिच्या भावाने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन आरोपींवर विनयभंग भा.द.वी. कलम ३५४ (अ)(ड) तसेच (पोस्को) बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२ चे कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही आरोपींना काही तासात अटक केली.
*** **** याद राखा, मुलींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही – पो नि यादव
‘कोणत्याही मुली-महिलांना कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही. कोणत्याही मुलींबाबत असा प्रकार घडत असेल किंवा घडला तर तात्काळ कर्जत पोलिसांना कळवा. तक्रारदाराचे नाव गुपित ठेऊन त्रास देणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी टवाळखोराना दिला.