
बोधेगाव दि.४(प्रतिनिधी)-
बोधेगाव ( ता. शेवगांव) येथील विविध विकास कामात आडकाठी व गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकाऱ्यां विरोधात योग्य ती कारवाई होण्यासाठी येत्या ८ मार्च रोजी शेवगाव- गेवराई रस्त्यावरील बनोमॉ दर्ग्यासमोर रस्तारोको आंदोलन करण्याचा ईशारा बोधेगाव ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य आधिकारी यांना निवेदनद्वारे दिला आहे.
बोधेगाव जिल्हा परिषद शाळा अनधिकृत वर्ग खोल्याप्रकरणी आत्तापर्यंत चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून या प्रकरणाशी निगडीत व जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी तसेच जिल्हा परिषद शाळेत नाविन वर्ग खोल्याचे बांधकाम चालू केले असता त्याला उपसरपंच तसेच शालेय व्यवस्थापन समितीतील काहीनी ते बंद पाडले, या संदर्भात गटशिक्षणाधिकारी, उप अभियंता, बिडिओ यांना निवेदने देण्यात आली परंतु त्यांनी फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली यामध्ये शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांना मात्र उन्हातान्हात वर्गाबाहेर बसण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत बोधेगावसाठी सौर प्रकल्प मंजूर करण्यात आला होता यामाध्यमातुन गावातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी यांना पूर्ण क्षमतेने २४ तास विज ५० टक्के दराने उपलब्ध होणार होती परंतु आर्थिक तडजोड न झाल्याने जमिनिच्या मोजनी अंती यावर हरकत घेण्यात आली आहे परंतु सदरील जमीन हि जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे आसुन ग्रामपंचायतीकडे फक्त देखभाल दुरुस्तीकरीता देण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नावाने उपलब्ध असलेल्या जमिनीवर सौरचा प्रकल्प उभारण्यात यावा. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी एका छ्ताखाली मंडळातील
( ग्रामपंचायत, तलाठी, कृषी मंडळ) कार्यालये रहावे याकरीता ग्रामसचिवालये उभारण्यात आली, बोधेगाव ग्रामसचिवालयाचा यासाठी उपयोग होत असताना अचानक येथील कामगार तलाठी कार्यालयाला बाहेर काढण्यात आले आहे तर कृषी मंडळातील आधिकाऱ्याना देखील जागा खाली करण्यासाठी तोंडी सांगण्यात आले आहे. या करणामुळे ग्रामस्थ व वयोवृद्ध नगरिकांचे मोठे हाल होणार आहेत. गावाच्या विकासात आडकाठी बनत असलेल्या सबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास येत्या ८ मार्च रोजी कोविड चे सर्व
नियम पाळत रास्ता रोको करण्याचा ईशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी यांना बोधेगावातील माजी सरपंच रामजी अंधारे, कुंडलिकराव घोरतळे, राष्ट्रवादी किसान सेलचे शेवगांव तालुकाध्यक्ष ज्ञानदेव घोरतळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विकास घोरतळे,नितीन घोरतळे, प्रकाश काळे, गुलाब दसपुते, माणिक गर्जे, भागवत भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.