खासदार सुजय विखे यांच्या विकासनिधीतून प्रबोधनकार क्रीडा प्रतिष्ठाणास रुग्णवाहिका भेट

कर्जत प्रतिनिधी : दि ४ मार्च
नगर दक्षिणचे खा डॉ सुजय विखे यांच्या स्थानिक विकासनिधीतून प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठाण कर्जत या संस्थेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली असून गुरुवार, दि ३ मार्च रोजी माजीमंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पाडला. प्रबोधनकार
प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्य घेण्यात आले होते. यामध्ये १३ रक्तदान शिबिरे, देशासाठी शाहिद झालेल्या शहीद जवानांच्या ९ मातांना ” वीरमाता पुरस्कार ” यासह माजीमंत्री राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेले TV9 चे पत्रकार कै पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाला रुपये ५१ हजार रुपयांची मदत दिली होती. तसेच विद्यार्थी वर्गासाठी भरीव काम केले आहे.
या रुग्णवाहिकेद्वारे कर्जत तालुका आणि परिसरातील गरजवंत रुग्णानी नाममात्र दरात याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पोटरे यांनी केले आहे.