लैगिंक अत्याचार प्रकरणातील 1 वर्षा पासुन फरार असलेला आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

अहमदनगर दि. 8 जुलै (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, आरोपी सुनिल अंबादास तांबे रा. घोडेगांव, ता. नेवासा याने नेवासा येथील अल्पवयीन फिर्यादीस फुस लावुन, लग्नाचे आमिष दाखवुन ती अल्पवयीन असतांना तिचे सोबत शरीरी संबंध ठेवुन अत्याचार केला. तसेच फिर्यादी तिचे लग्ना नंतर गरोदर असतांना तिचे सोबत शरीरी संबंध ठेवता यावे. या करीता आरोपींने तिस गर्भपाताच्या गोळ्या देवुन गर्भपात केला व फिर्यादीस वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देवुन मारहाण केले बाबत नेवासा पो.स्टे.गु.र.नं. 379/2023 भादविक 376 (2)(एन), 420, 313, 323, 504, 506 सह बा.लै.अ.सं.अ.क. 4, 6 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला होता.
मा.श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन मिळुन आल्यास आवश्यक कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, रविंद्र पांडे, सुरेश माळी व देवेंद्र शेलार अशांचे पथक नेमुण अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले. स्थागुशा पथक शरीरा विरुध्द दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींची माहिती घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे सुनिल तांबे रा. घोडेगांव, ता. नेवासा हा आगरकरमळा, रेल्वे स्टेशन अहमदनगर परिसरात राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने आगरकरमळा, रेल्वे स्टेशन अहमदनगर परिसरात फिरुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन तो स्मृतीकॉलनी येथे बातमीतील वर्णना प्रमाणे इसम मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सुनिल अंबादास तांबे वय 37, रा. घोडेगांव, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास पुढील कारवाई करीता नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. सुनिल पाटील साहेब, उविपेअ, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.