३मोक्याच्या गुन्ह्यासह ४५ गंभीर गुन्हे दाखल असलेला व २६ गंभीर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद! गुन्ह्यासह ४५ गंभीर गुन्हे दाखल असलेला व २६ गंभीर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद!

अहमदनगर दि.५ ( प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध शहरासह ४५ गंभीर गुन्हे दाखल असलेला व ३ मोक्क्याच्या गुन्ह्यासह एकुण २६ गंभीर गून्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपी संदीप ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वातील कुविख्यात अशी संदीप ईश्वर्या भोसलेची ओळख असून त्याला रत्नागिरी येथे अटक करण्यात आली पोलिसांनी संदीप ईश्वर्या भोसले याला पकडण्यासाठी तीन दिवस वेषांतर करून त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. सदरील आरोपीला बीडमध्ये पोलिसांनी पकडले असता तो बेडी सह यापूर्वी पळून गेला होता.संदीप ईश्वर्या भोसले याला सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं-मुली आहे.अनेक वर्षांपासून तो फरार होता काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र तो पळून जाण्याचा यशस्वी झाला होता.सदर गुन्हाचा स्थानिक गुन्हे शोखतील अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असतांना गुन्हयातील आरोपी नामे मिलन उर्फ मिलींद ईश्वर भोसले (वय 23, रा.बेलवंडी,ता.कर्जत हल्ली राहणार वनकूटे शिवार, ता.पारनेर) यास ताब्यात घेवुन तपासा दरम्यान याने 1,01,850/- रुपये किंमतीचा मुद्देमाल काढुन दिला. तसेच सदरचा गुन्हा त्याचे साथीदार संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले, पल्या ईश्वर भोसले, अटल्या उर्फ अतूल ईश्वर भोसले अशांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.सदरची कामगिरी जिल्हापोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,सपोनि.सोमनाथ दिवटे,पोहेकॉ सुनिल चव्हाण,दत्ता हिंगडे, संदीप पवार, पोकॉ.सागर ससाणे व रणजीत जाधव यांनी केली आहे.