देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :हम अंग्रेजों के ज़माने के जेलर है”!
शोले चित्रपटातील या डायलॉगमुळे भारताच्या काण्या कोपऱ्यात पोहचलेले जेष्ठ हास्य अभिनेते असराणी म्हणेजच शोले चित्रपटातील जेलरची भूमिका अजरामर करणारे काळाच्या पडद्याआड गेल्याने हिंदी चित्रपट सृष्टीवर ऐन दिवाळीत
शोककळा पसरली आहे.
84 व्या वर्षी असराणी यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या अभियानाचे वैशिष्ट्ये म्हणजे. हास्यविनोदावर प्रभुत्व-असराणी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक होते. त्यांच्या संवादफेकीतील टाइमिंग, चेहऱ्यावरील भाव आणि हावभाव यांमुळे प्रेक्षक हसून लोटपोट व्हायचे.
‘शोले’मधील जेलर — अमर व्यक्तिरेखा
१९७५ च्या ‘शोले ‘चित्रपटातील “ हम अंग्रेजों के ज़माने के जेलर” ही भूमिका असराणींच्या अभिनयाचे सर्वोच्च उदाहरण ठरली. त्यातील त्यांचा चेहर्यावरील विक्षिप्त भाव आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात नेहमीच राहतील.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा