जवाहर विद्यालयात शिवजयंती साजरी

जवाहर विद्यालयात शिवजयंती साजरी
अहमदनगर ( प्रतिनिधी/प्रा.रावसाहेब राशिनकर)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा,ता.नेवासा जि.अहमदनगर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्राचार्य एम.आर.गुंड यांच्या अध्यक्षतेखाली कोविड नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली.उच्च माध्यमिक विद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक भगवान भाबड यांनी आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा,युद्धनीती,राज्याभिषेक सोहळा,व सर्वसमावेशक राज्यकारभार यावर प्रकाशझोत टाकत मार्गदर्शन केले. शिक्षकेतर कर्मचारी प्रणित कोडम यांनी आपल्या बहारदार शैलीत शिवरायांचा पोवाडा सादर करत सर्वांची मने जिंकून घेतली.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य एम.आर.गुंड यांनी शिवप्रभुचरणी हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर नाहीसे व्हावे व ज्ञानमंदिर विद्यार्थ्यांनी गजबजून जावो अशी प्रार्थना केली.आज वाढदिवस असणारे शिक्षक श्री. जालिंदर शेटे यांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक एच.के जावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख हरिष दगडखैर, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशिनकर,स्काऊट मास्टर बाळासाहेब भोसले यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक एच.के.जावळे यांनी तर सुत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ सदस्य श्रीमती स्वाती दळवी यांनी केले.स्काऊट मास्टर बाळासाहेब भोसले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.