देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर : दि. 29 ऑगस्ट : बहुजन विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थी म्हणून नव्हे तर भावी नागरिक म्हणून अध्यापन केले असल्याचे प्रतिपादन दादासाहेब रुपवते विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्रा. किरण इंगळे यांनी केले. त्यांचा सेवापूर्ती चा कार्यक्रम येथील बहुजन शिक्षण संचलित दादासाहेब रुपवते विदयालय व जुनिअर कॉलेज येथे संम्पन्न झाला. यावेळी त्यांचा त्यांच्या सुविद्य पत्नी रेखाताई इंगळे व कुटूंबिया समवेत दादासाहेब रुपवते विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शाल, फेटा, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना प्रा. इंगळे बोलत होते. सेवापुर्ती समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटनेचे माजी अध्यक्ष भास्करराव जऱ्हाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी, यांनी केले.यावेळी बहुजन शिक्षण संघांचे रजिस्ट्रार प्रा. रवींद्र एडके, माजी रजिस्ट्रार प्रा. व्ही. एम. बैचे, निवृत्त नायब तहसीलदार शशिकांत दळवी, पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड,प्रा. राहुल खंडीझोड,संपादक महेश भोसले, प्रा.भिमराव पगारे, संजय पाबळकर, नेहा नेहा इंगळे, सदाशिव पवार, आदिनाथ मोरे, दिपक ठाणगे, ज्ञानदेव कोरडे आदींनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करत प्रा. इंगळे यांना पुढील निवृत्ती नंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुढे बोलतांना प्रा. इंगळे म्हणाले, आजचा क्षण माझ्यासाठी अत्यन्त भावुक आहे. 31 वर्षांपूर्वी महाविद्यालय पाऊल ठेवले त्यावेळी आम्ही आमच्या गुणवत्तेने महाविद्यालयात रुजू झालो माझा विषय राज्यशास्त्र असल्यामुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी संस्थेमुळे मिळाली. आजही मला माझी जुने विद्यार्थी जे चांगल्या पदावर कार्य करीत आहेत ते भेटून सर आपण दिलेल्या राज्यशास्त्राचे ज्ञान आम्हाला उपयुक्त ठरत असल्याचे वाक्य ऐकल्यामुळे आपण 31 वर्ष केलेल्या अध्यापन सेवेचे समाधान वाटते. लोकशाही ही जगण्याची पद्धत आहे. हे विद्यार्थ्यांवर बिंबवण्याचे काम मी शिक्षक म्हणून केले. आणि यात मला मनापासून समाधान असल्याची भावना प्राध्यापक किरण इंगळे यांनी यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केली. यावेळी त्यांचा त्यांच्या पाहुण्यांकडून मित्र परिवाराकडून त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित मान्यवर व मित्रांना स्नेहभोजन देण्यात आले. सेवापूर्ती कार्यक्रम समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सोपान कदम, प्रा. महेंद्र कदम, प्रा. संदीप पाखरे, प्रा. संजीवन साळवे, कलाशिक्षक अजय भिंगारदिवे,प्रा. शाम यादव भिमराव जाधव, संघर्ष साळवे,राजू ससाने,महेंद्र शिंदे सुवर्णा खोसे, रुपाली झाडे, अनिता हांगेकर,सुनीता पटेकर, रेखा गायकवाड, मंदा साठे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोपान कदम यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा