पिंपळगाव माळवी येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरन जनजागृती व स्वच्छता सप्ताह साजरा!

अहमदनगर दि. १४ जून (विजय प्रभूने) नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम तसेच लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटी कृषी महाविद्यालय, विळद घाट, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वच्छता सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला.
पर्यावरण व जनजागृती व स्वच्छता अभियान सप्ताह निमित्ताने पिंपळगाव माळवी या गावामध्ये गावाची स्वच्छता कशी राखावी तसेच स्वच्छ्तेचे किती महत्व आहे. हे पथनाट्याच्या माध्यमातुन गावासमोर सादर केले. तसेच झाडे लावा झाडे जगवा, या उद्देशाने वृक्षारोपन गावच्या सरपंच सौ. राधिका संजय प्रभुणे उपसरपंच सौ. भक्ती बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यावरनाचे महत्व स्वच्छतेचे महत्व प्लॉस्टिक मुक्त गाव, पाणी वाचवा पाणी आडवा, टाकाऊ पासुन टिकाउ, घन कचरा व्यवस्थापन या विषयी माहिती जनते समोर मांडण्यात आली.
यावेळी सरपंच सौ.राधिका प्रभुणे, उपसरपंच भक्ती बनकर, ग्रामपंचायत पंचायत सदस्य सुधीर गायकवाड, तसेच सावतामाळी पतसंस्थचे संस्थापक शिंदे साहेब. सेवा कृषी महाविदयालयाचे प्राचार्य – डॉ. एस. बी. राउत रा.सी.यो, कार्यक्रम अधिकारी प्राचार्य किरण दांडगे, प्रा. भोसले, प्रा. ठोंबरे, प्रा. डमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी मागदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन , अस्मिता डोंगरे यांनी केले, तर प्रस्तावना प्रा० किरण दांगडे व आभार कुमार कृष्णा महाडिक यांनी मानले.यावेळी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.