देशस्तंभऑनलाइन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर, दि. 19 एप्रिल (प्रतिनिधी): विवाहितेच्या घरात घुसून तिला स्टीलच्या ग्लासने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या आरोपातून विमल मिसाळ आणि प्रियंका सतीश मिसाळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. सप्टेंबर २०२४ मध्ये दीक्षा निलेश मिसाळ यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सदर खटल्यात ज्येष्ठ वकील अॅड. सुहास टोणे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अमित बी. अडागळे आणि त्यांना सहकार्य म्हणून
अॅड. अक्षय डी. शिंदे यांनी प्रभावी काम पाहिले. त्यांनी उलटतपासणीत फिर्यादीच्या जबाबातील विसंगती, घटनेच्या वेळी स्वतंत्र साक्षीदाराचा अभाव आणि कौटुंबिक पूर्ववैमनस्यातून झालेली तक्रार हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती डी. के. पाटील यांनी दोन्ही आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा