अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विद्युत महावितरणांच्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन नालेगाव व नेप्ती शिवारातील कल्याण रोड ते निंबळक पर्यंत शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्याची मागणी! शेतकऱ्यांसह 15 ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशारा!

अहमदनगर दि.१२ जुलै (प्रतिनिधी)- नालेगाव व नेप्ती शिवारातील कल्याण रोड चौफुला ते निंबळक पुलापर्यंत रोड लगत अंदाजे ३ किलोमीटर अंतरासाठी शेतकऱ्यांना शेती कामासाठी विद्युत कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना निवेदन देताना महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखाताई सांगळे समवेत पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे सचिव दत्ताभाऊ वामन, रावसाहेब काळे, सुनील सकट, सुनील ठाकरे, महेश नल्ला, बाळासाहेब बेल्हेकर, भैया पठाण, विलास नंदी, बबू सय्यद, काशिनाथ रोहोकले, गणेश लांडे आदीसह शेतकरी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की. नालेगाव व नेप्ती शिवारातील शेतकऱ्यांनी वरील संदर्भीय विषयानुसार वेळोवेळी निवेदन करूनही व प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केलेली आहे. तरी २ वर्ष ९ महिने होऊन देखील अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचे उत्तर अथवा कामकाज झालेले दिसत नाही. प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसून संबंधित विभागाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात यावे अन्यथा १५ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसह आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.