मोटर सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार तोफखाना पोलीसांच्या जाळयात कारवाई दरम्यान एकुण 07 मोटार सायकल केल्या हस्तगत

अहमदनगर दि. 6 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
दिनांक 04/10/2023 रोजी दुपारच्या सुमारास तोफखाना पोलीस सावेडी भागात पेट्रोलींग करत असताना एक संशयीत मोटार सायकल स्वार वसंत विजय शिंदे वय-20 वर्षे रा. दहेगाव पालखेड ता. वैजापुर जि. संभाजीनगर हा त्याचे ताब्यातील हिरो कंपणीची डिलक्स मोटर/सायकल क्रमांक एम.एच. 16 बी.क्यु.-7708 हिचेवर संशीयतरित्या फिरताना मिळुन आल्याने त्याचेकडे ताब्यात असलेल्या मोटर सायकलच्या कागदपत्रा बाबत विचारणा केली असता त्याने उडावा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यास चौकशी कामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटार सायकल हि त्याचे साथीदारा नामे विनोद कडुबाळ सरकाळे वय-28 वर्षे रा.बंधनलॉन मागे. सावेडी अ.नगर व सागर लक्ष्मण कु-हाडे वय-25 वर्षे रा.ढवणवस्ती तपोवन रोड,अहमदनगर यांचे मदतीने एम आय डी सी परसीरातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे साहय्याने त्याचे साथीदारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी अहमदनगर शहरातुन विविध ठिकाणा वरुन एकुण 07 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन सदर मोटार सायकल या काढुन दिल्याने त्या पंचनाम्यान दरम्यान जप्त करुन त्यांना तोफखाना पोलीस स्टेशनचे खालील गुन्हयात ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
1) तोफखाना गु.र.नं. 1425/2023 भा.द.वी.क.379 2) तोफखाना गु.र.नं. 1402/2023 भा.द.वी.क.379
3) तोफखाना गु.र.नं. 1470/2023भा. द.वी.क.379
4) एम आय डी सी पो.स्टे. गु.र.नं. 846/2023 भा.द.वी.क.379
वरील गुन्हयातील व इतर गुन्हयातील खालील वर्णनाच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
1) MH-16DE-3258 एच.एफ. डिलक्स हिरो कंपणीची मोटार सायकल
2) MH-20FJ-7737 बजाज कंपणीची पल्सर 180 सी.सी. 3) MH-20 DM-6679 पॅशन प्रो हिरो कंपणीची मोटार सायकल
4) MH-16 BQ-7708 एच.एफ. डिलक्स हिरो कंपणीची मोटार सायकल
5) MH20GF0943 सुझुकी कंपणीची मोपेड AVENIS मॉडेलची 6) MH-12DZ-3925 इंजीन नं.B07023F43431 चेसी नं.PM1597CMGBG
7) चेसी नं.06EACF04879 इंजीन नं.06 EACE04987 हिरो होंडा कंपणीची सुपर स्पीलेंडरसदरची कारवाई हि मा.पोलीस अधिक्षक सो श्री. राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण, श्री.भोसले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, यांचे पथकातील सपोनी नितीन रणदिवे, पोसई सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दिनेश मोरे, पोहेकॉ/संतोष गर्जे, पोना/भानुदास खेडकर, पोकॉ/सुमित गवळी, पोना/चांगदेव आंधळे, पोना भास्कर गायकवाड, पोकॉ/राहुल म्हस्के, पोकॉ/नितीन शिंदे यांनी कली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/चेमटे हे करीत आहेत.