कौतुकास्पद

“सुरेश भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है ” तरुण भीमसैनिकां मध्ये वाढतेय सुरेश बनसोडे नावाची “क्रेझ”

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 29 जुलै : 27 जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ऐतिहासिक अनावरण सोहळा मोठया जल्लोषपूर्ण व “जयभीम ” घोषात संपन्न झाला.
आपण सर्व त्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालो, या सोहळ्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह सर्वच रिपब्लिकन नेते उपस्थित होते. याच सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीत गायनाचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर त्यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम सुरु असतांना तरुण भीम सैनिकांनी ” सुरेशभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है “ अशा घोषणा देत त्यांना खांद्यावर घेऊन नाचविले, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. शहरातील तरुण भीमसैनिकां, तरुणाई मध्ये बनसोडे यांची चर्चा असतेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यामूळे ही ” केझ ” वाढते आहे. हेच सध्याचे चित्र आहे.येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत सुरेश भाऊ कोणत्या प्रभागातून उभे राहणार आहेत या चर्चा तरुणाई मध्ये रंगत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे