देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 19 ऑक्टोबर:
डॉक्टर नव्हे हे तर कसाई!
कोरोना महामारीच्या काळातील मृत्यू प्रकरणी अहिल्यानगर शहरातील न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. गोपाळ बहुरुपी यांच्या सह पाच डॉक्टरांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाणे तोफखाना पोलिसांना दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की
कोविड महामारीच्या कालावधीत (२०२१)
साधा खोकला आला म्हणून अहिल्यानगरच्या (त्यावेळचं अहमदनगर) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. मात्र त्या गल्लाभरु, नालायक आणि स्वार्थी डॉक्टरनं कोविड आजाराची लक्षणं असल्याचं सांगून त्या रुग्णाला बळजबरीनं दाखल करुन घेतलं. त्या रुग्णावर चुकीचे वैद्यकीय उपचार केले, त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून कोट्यवधी रुपये उकळले आणि दुर्दैवानं त्या सहृदयी माणसाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर मरण पावले. त्या सहृदयी माणसाचं नाव आहे अशोक खोकराळे. अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांचा फक्त आणि फक्त डॉक्टरच्या स्वार्थी वृत्तीमुळेच मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशोक खोकराळे यांनी केलेल्या तब्बल चार वर्षांच्या अथक पाठपुरानंतर आज (दि. १८) खऱ्या अर्थाने यश आलं आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. गोपाळ बहुरुपी यांच्यासह पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२०२१ मध्ये आलेल्या कोविड महामारीमध्ये रुग्णावर केलेल्या चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अहिल्यानगरच्या पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह अन्य गंभीर भारतीय दंड कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोविड महामारीत चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे बबनराव नारायण खोकराळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचे चिरंजीव अशोक खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात धाव घेतली. तब्बल चार वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर अहिल्यानगरच्या पाच डॉक्टरांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या पाच डॉक्टरांमध्ये अहिल्यानगरचे न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, कोविड सेंटरचे डॉ. सचिन पांडोळे, झावरे हॉस्पिटलचे अक्षदीप झावरे, ग्लोबस पॅथॉलॉजी अँड इम्युनोअसचे डॉ. मुकुंद तांदळे यांचा समावेश आहे.
दिनांक ३० जूलै २०२१ रोजी सिव्हिल रिट पिटीशन ८१२२ / २०२१ या दाखल रिट पिटीशनमध्ये अहिल्यानगर (त्यावेळचे अहमदनगर) सिव्हिल हॉस्पिटलच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या सहा डॉक्टरांच्या कमिटीने बबनराव नारायण खोकराळे यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांचा अहवाल दि.
. ७. ९. २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात सादर केला. या दाखल अहवालामध्ये त्या पाच डॉक्टरांसंदर्भात सहा डॉक्टरच्या कमिटीने गंभीर स्वरूपाचे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. या कमिटीच्या अहवालानुसार बबनराव खोकराळे यांचे चिरंजीव अशोक खोकराळे यांनी दि.१०.११.२०२१ रोजी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे बबनराव खोकराळे यांच्यावर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांचे सर्व कागदपत्रं सादर केले.
अशोक खोकराळे यांनी सहा डॉक्टरांच्या कमिटीने दिलेल्या अहवालानुसार दोषी असलेल्या पाच डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली होती. परंतु त्यावेळी खोकराळे याची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. अनेक वेळा पाठपुरावा करुनही तक्रार दाखल होत नसल्यामुळे अशोक खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठात दि. २०.८.२०२२ दि. ५. २. २०२२ रोजी क्रिमिनल रिटफीटेशन दाखल केली होती.
या रिट पिटिशनमध्ये न्यायालयाने दि. १५. १०. २०२५ रोजी अतिशय परखडपणे पोलिसांना फटकारत न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, कोविड सेंटरचे डॉ. सचिन पांडोळे, झावरे हॉस्पिटलचे अक्षदीप झावरे, ग्लोबस पॅथॉलॉजी अँड इम्युनोअसचे डॉ. मुकुंद तांदळे या दोषी पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह अन्य गंभीर स्वरुपाच्या भारतीय दंड विधान कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची निर्देश देत सदरचा गुन्हा नोंदविण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना फक्त चारच दिवसांचा अवधी दिलेला आहे.
सदर गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिनांक १५/१०/२०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार काल (दि. १८) रोजी गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अशोक खोकराळे यांच्यावतीनं ॲड. राजेंद्र देशमुख (सिनिअर कॉन्सिल छत्रपती संभाजीनगर, खंडपीठ)
ॲड. मंजुषा जगताप – वारे (छत्रपती संभाजीनगर खंडपीठ)
ॲड. अनिकेत कुलाळ (अहिल्यानगर) यांनी काम पाहिलं. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर न्यायालयाच्या निर्देशानुसार अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात त्या दोषी असलेल्या पाच डॉक्टरांविरुद्ध प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पाच दोषी डॉक्टरांना तोफखाना पोलीस कधी गजाआड करणार? याबाबत शहरातील नागरिकांमधून चर्चा होत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा