देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:आहिल्यानगर दि. 18 ऑक्टोबर: मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पो.नि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणे कामी पथकास रवाना केले.
दिनांक 17/10/2025 रोजी वर नमुन पथक हे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असतांना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे संदिप सुभाष शिंदे रा. भानसहिवरे ता. नेवासा याने इसम नामे भगवान पुंड रा. करजगांव तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकादार यांचेकडुन विनापरवाना रेशनिंगाचा तांदुळ खरेदी करुन सदरचा तांदुळ हा संजय अग्रवाल गजानन ऍग्रो करोडी ता.जि.छ.संभाजीगनर येथे विक्री करण्याकरीता त्याचे भानसहिवरे गावातील गोडावुनमध्ये साठवणुक करुन ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नेवासा पोलीस स्टेशनचे सपोनि/अमोल पवार तसेच पंचासमक्ष भानसहिवरे येथील संदिप सुभाष शिंदे याचे गोडावुनची माहिती काढुन सदर गोडावुन येथे जावुन खात्री करता गोडावुनमध्ये एक इसम बसलेला दिसला. सदर इसमास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नांव संदीप सुभाष शिंदे वय – 35 वर्षे रा. भानसहिवरे ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गोडावुनचे मालकाबाबत विचारपुस करता त्याने सदरचे गोडावुन हे त्याचे मालकीचे असल्याचे सांगितले. पथकाने सदर गोडावुनची पंचासमक्ष पाहणी करता सदर गोडावुनमध्ये असलेल्या गोण्यामध्ये तांदुळ असल्याचे दिसुन आले. सदर मिळुन आलेल्या तांदुळ बाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचा तांदुळ हा रेशनिंगचा असुन तो इसम नामे भगवान पुंड रा. करजगांव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याचेकडुन तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकानदार यांचेकडुन काळ्याबाजारामध्ये खरेदी करुन संजय अग्रवाल गजानन ऍग्रो करोडी ता. जि. छ. संभाजीगनर यास विक्री करण्यासाठी घेतलेला असल्याचे कळविले.पंचासमक्ष सदर गोडावुनची पाहणी केली असता त्यामध्ये 450 गोण्यामध्ये एकुण 22,500/- किलो तांदुळ असा एकुण 11,25,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन त्याचेविरुध्द पोकॉ/2520 प्रकाश नवनाथ मांडगे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 899/2025 जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे सपोनि/अमोल पवार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा