मुळा धरणातील बेपत्ता प्रवासी बोटीची चौकशी करून कारवाई करा अन्यथा गेटबंद आंदोलन – भाऊसाहेब पगारे

बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी — राहुरी येथील मुळा धरण येथील प्रवासी बोट बेपत्ता झाली असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबधित शाखा अभियंत्यावर तत्काळ कारवाई न केल्यास १५ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील मुळा पाटबंधारे कार्यालयाचे गेट बंद करू असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.
मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष पगारे यांनी म्हंटले की, वावरथ आणि जांभळी येथील नागरिकांना राहुरी शहराच्या संपर्कासाठी तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी विभागातून अनुदान मंजूर करून एक यांत्रिक बोट २००२ साली उपलब्ध करुन दिली होती. २०१३ दरम्यान सदर यात्रिकी बोट खराब झालेमुळे ती कायमस्वरुपी बंद करुन धरणामध्ये पोलिस चौकीजवळ लावली होती.
ती बोट सध्यस्थिती गायब असून,तिचा शोध लागत नाही. शाखा अभियंता मुळा धरण शाखा यांचे कार्यकाळातच बेपत्ता झाली आहे. ती बोट भगारात विकली असल्याचे समजले आहे. याकरिता एक चौकशी समिती नेमली असून, ती चौकशी समिती चौकशी कामी टाळाटाळ आणि दिरंगाई करत आहेत. म्हणून शिघ्रगतीने चौकशी करून योग्य ती फौजदारी कारवाई जबाबदार अधिकाऱ्यावर करावी. आणि श्री. आंधळे यांचे कडील उपअभियंता पदाचा पदभार तात्काळ काढून घ्यावा अन्यथा कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर येथे आरपीआय आंबेडकर गटाच्यावतीने धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा पगारे यांनी दिला आहे.