राष्ट्रवादीकडून उषा राऊत यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल

राष्ट्रवादीकडून उषा राऊत यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल
कर्जत: दि.9 (प्रतिनिधी) कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा मेहेत्रे- राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. त्यामुळे उषा राऊत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या असून १६ रोजी फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. सदर अर्जावर सुचक म्हणून छाया सुनील शेलार तर अनुमोदक म्हणून ताराबाई सुरेश कुलथे यांची स्वाक्षरी आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. आ रोहित पवार यांनी भाजपाच्या राम शिंदेकडून कर्जत नगरपंचायत ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने १५ जागेवर विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला होता. भाजपाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानावे लागले होते.
कोट : राऊत यांची पाटी कायम
कर्जत नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून भाजपाकडून नामदेव राऊत विराजमान झाले होते. त्यानंतर अडीच वर्षानंतर पुन्हा नामदेव राऊत यांची उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या स्नुषा असणाऱ्या उषा राऊत यांचा राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षापदी अर्ज प्राप्त झाल्याने “राऊत” यांच्या नावाची पाटी कर्जत नगरपंचायत कायम राखण्यात यशस्वी झाले आहे.