खळबळजनक

शेवगाव येथील अकस्मात मृत्यू प्रकरणाचा उलगडा दोन आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 10 ऑगस्ट: दिनांक ०९/०८/२०२५ रोजी शेवगाव पोलिस ठाणे हद्दीतील ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर येथील ऊसाच्या शेतात अंदाजे २०-२२ वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृत्यू संशयास्पद असल्याने सदर प्रकरण शेवगाव पोस्टे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ९४/२०२५, भा. न्या. सु. सं. कलम 194 प्रमाणे दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान मयताची ओळख पटवून त्याचे नाव आकाश लक्ष्मण किडमिचे (वय २० वर्षे, रा. रामनगर, शेवगाव) असे निश्चित करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पोहेकॉ २१५९ हृदय घोडके, पोहेकॉ किशोर शिरसाठ, पोहेकॉ सागर ससाणे, पोहेकॉ प्रमोद जाधव व चासफो उमाकांत गावडे यांनी समांतर तपास करून, खालील आरोपींना ताब्यात घेतले –
१) विजय चंदर किडमिचे (वय २० वर्षे)
२) अरुण लाला उपदे (वय १९ वर्षे)
(दोघे रा. रामनगर, शेवगाव, जि. अहिल्यानगर)
शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून मयताचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपींना दिनांक ०९/०८/२०२५ रोजी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री वैभव कलबुर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि मा. Dr. बसवराज शिवपुजे, विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर (अतिरिक्त कार्यभार शेवगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे