भिंगारला उज्ज्वल योजनेतून महिला लाभार्थीना गॅसचे वाटप. नगरसेविका शुभांगीताई साठे यांच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर दि.३ (प्रतिनिधी)- भिंगार भाजपा नगरसेविका शुभांगीताई साठे यांच्या विशेष प्रयत्नातून उज्ज्वला २.0 या योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थीना शेगडी व गॅस सिलिंडरचे वाटप भिंगार येथिल मारुती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहांडे, भारत गॅस एजन्सीचे मालक रोहिदास कर्डीले, नगरसेविका सौ.शुभांगीताई साठे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे म्हणाले, भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजनेसारख्या देशातील गोरगरिबांसाठी अनेक योजना येणारे काळात सुरू केल्या आहेत. महिलांना मोफत शिलाईमशिन दिले जात आहे. यामुळे नागरिकांनी केंद्राच्या जास्तीत जास्त योजनाचा लाभ घ्यावा, असे यावेळी गंधे यांनी आवाहन केले.
नगरसेविक सौ.शुभांगीताई साठे म्हणाल्या की आम्ही केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. त्याचे फळ हे देशात पाहण्यास मिळत आहे. यामुळे भिंगार येथिल नागरिकांनी जास्तीत जास्त केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा. भाजप पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे देशातील गोरगरिबांच्या प्रमुख येणारे समस्या सोडविण्यासाठी केंद्रतील भाजप नेहमीच प्रयत्नशील व गतीशील राहिले आहे. तसेच यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहांडे, रोहिदास कर्डीले आदिंसह मान्यवरांची भाषणे झाली. भिंगार भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.जोत्सनाताई मुंगी यांनी प्रास्ताविक केले. सूञसंचालन व आभार गणेश साठे यांनी मानले. यावेळी भाजपाचे महेश नामदे, लक्ष्मीकांत तिवारी, राजु दहिहांडे, सुरेश तनपुरे, ब्रिजेश लाड, निलेश गांधी, निलेश साठे, सचिन दळवी, सचिन फिरोदिया, आनंद बोथरा, अनंत रासने, सौरभ रासने, दिपक फळे, संतोष हजारे, चेतन वझगडेकर, मयुर जोशी, कैलास गव्हाणे, स्वप्निल गायकवाड, स्वप्निल शेलार, ॠषिकेश मोरे, सतिष नागपुरे आदिंसह भाजपाचे कार्यकर्ते व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.