बाराबाभळी येथील महेशनगर येथील रस्ता दुरुस्त करा: ग्रामपंचायत दलित महासंघाचे गट विकास अधिकारी यांच्याकडे मागणी!

अहमदनगर दि. २२ जानेवारी (प्रतिनिधी) : वॉर्ड क्र. २ महेशनगर बाराबाभळी ग्रामपंचायत या गांवाची मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढलेली असुन या गांवात ब-याच दिवसापासुन रस्त्याचे मोठया प्रमाणात अडी-अडचणी निर्माण झालेल्या असुन गावात येणारा मुळ रस्ता हा अतिशय खराब झालेला असुन येथे जाणा-या येणा-या टू व्हिलर, फोर व्हिलर याप्रमाणे मोठया प्रमाणात वाहन जा ये करतात व अनेक ठिकाणी खड्डे झालेले असुन अचानकपणे जोरात टू व्हिलर आल्यानंतर अपघात होण्यांची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे अनेक ठिकाणी वॉल असुन तो वॉल फुटलेला असुन यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचून साचुन खड्डे पडलेले आहेत. तसेच आम्ही ग्रामस्थ यापूर्वी अनेक वेळा याबाबत तक्रारी अर्ज सादर करुनही कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात येत नाही व यामुळे रस्त्याची मोठया प्रमाणात रस्त्याचे दुरावास्ता झालेली आहे. गटविकास अधिकारी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा व गांवातील रस्त्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी याची दखल न घेतल्यास येत्या १५ दिवसात दलित महासंघ व ग्रामस्थ यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यांत येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती व पाणी पुरवठा विभाग यांची आहे व राहील. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू,
जिल्हा महिला अध्यक्ष अरुणाताई कांबळे, भिंगार शहर अध्यक्ष प्रवीण कुमार जाधव आदी उपस्थित होते.