राजकिय

काँग्रेसच्या किरण काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत कळमकरांना केला पाठिंबा जाहीर ; मतांचे विभाजन टाळत महाविकास आघाडीचा धर्म पाळणार… जगतापांच्या पराभवासाठी ठामपणे साथ देणार

अहिल्यानगर दि. 4 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी काळे यांच्याशी संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दक्षिणेतील नगर शहरासह सहापैकी दोन जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी काँग्रेसची स्थानिक व राज्य पातळीवर देखील मागणी होती. मात्र ही जागा विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी काळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गळ घातल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करत काळे यांनी माजी आ. दादाभाऊ कळमकर आणि अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एकसंधपणे निवडणूक जिंकण्या करिता काळे यांनी अर्ज मागे घेत काँग्रेस आणि काळे समर्थकांचे संपूर्ण बळ कळमकर यांना निवडून आणण्या उभे करण्याचे जाहीर केले. या निवडणुकीत ठामपणे कळमकरांना साथ देण्याची भूमिका काळे यांनी घेतली आहे.

परिवर्तन घडवून आणू :
शहरात गुंडगिरी, दहशत, ताबेमारी, राजकारणाचे झालेल्या गुन्हेगारीकरण यामुळे विकास खुंटला आहे. शहराची प्रगती झाली पाहिजे. यासाठी मतांचे विभाजन होणे योग्य नाही. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. भविष्यामध्ये शहरात काँग्रेस अधिक मजबूत करण्याचे काम करत असताना शहर विकासाच्या दृष्टीने आमची ठाम भूमिका आहे. ही निवडणूक सर्वसामान्य नगरकर हातामध्ये घेऊन लढणार आहेत. त्यामुळे कळमकर यांना निवडून आणण्यासाठी माझ्यासह काँग्रेस कार्यकर्ते जीवाचं रान करतील, अशी प्रतिक्रिया अर्ज माघारी नंतर किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे